
नीट पेपरफुटीनंतर तरूणांनी जंतरमंतरवर केलेल्या आंदोलनानंतर अखेर सरकारला शरणागती पत्करावी लागली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मंत्री पदाचा राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज रत्नागिरीत शिव, शाहु, फुले आंबेडकर विचारमंचाने फटाक्याची आतषबाजी करत आंदोलन केले.
शिव शाहू फुले आंबेडकर विचारमंचाचे सर्व सदस्य आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आज सायंकाळी मारूती मंदिर येथे जमले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जल्लोष केला.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, अभिजीत हेगशेट्ये, राजू जाधव, बशीर मुर्तुझा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



























































