
ऑस्ट्रेलियातील कॅपिटल टेरिटरीच्या शिक्षण मंत्री यवेट बेरी यांनी त्यांच्या खात्यातील दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होताच तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदुस्थानात नीटचा एवढा महत्त्वाचा पेपर फुटला, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, मात्र, हिंदुस्थानातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे पदावर बसून आहेत. प्रधान यांनी बेरी यांच्यापासून शिकले पाहिजे, अशी टीका आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.




























































