
कल्याण शीळ रोडवरील मेट्रो-१२ प्रकल्पाच्या कामामुळे शुक्रवारी सकाळी प्रचंड वाहतूककोंडी झाली. मेट्रोच्या कामासाठी उभारलेल्या बॅरिकेड्समुळे मानपाडा जंक्शन ब्लॉक झाला आणि दोन तास वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक पोलीस घटनास्थळी नसल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला तर या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी काहींनी विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. सकाळी सातपासून नऊ वाजेपर्यंत वाहतूककोंडीत कार्याल यीन कर्मचारी, शालेय बस, रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या.



























































