
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही, असा ठाम पवित्रा विरोधी पक्षांनी घेतल्याने आजही संसदेचे कामकाज ठप्पच राहिले. प्रचंड गदारोळानंतर संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही, असा ठाम पवित्रा लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी घेतला. राज्यसभेत, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉलवरून संदेश देण्यापेक्षा संसद ही सर्वोच्च आहे. संसदेत येऊन आपले निवेदन द्यावे, अशी मागणी केली. त्यामुळे सभागृहात जोरदार गदारोळ झाला.
धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विरोधकांची लोकसभेत जोरदार घोषणाबाजी#neet #cjp #abhijeetdipke pic.twitter.com/Q6IeNQLUDC
— Saamana Online (@SaamanaOnline) July 24, 2026

























































