गोंधळलेल्या पंतप्रधानांनी खुर्चीवर राहू नये, देश अडचणीत येईल; संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषण शैलीतील बदलावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी आतापर्यंत आपल्या भाषणाची सुरुवात ‘मित्रो’ या शब्दाने करत असत, मात्र आता ते ‘फ्रेण्ड्स’ म्हणत आहेत, यावरून संजय राऊत यांनी त्यांच्या गोंधळलेल्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करत देश अडचणीत येईल अशी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, जंतरमंतरवरील पिढी नरेंद्र मोदी यांची कधीही ‘फ्रेण्ड्स’ होणार नाही. पंतप्रधान सध्या पूर्णपणे गोंधळलेले असून त्यांचा मेंदू नीट काम करत नाहीये. त्यांचा चेहरा सुजलेला आहे. त्यांची झोप उडालेली आहे. इतक्या गोंधळलेल्या पंतप्रधानांनी खुर्चीवर राहू नये, देश अडचणीत येईल. त्यांच्यापासून देशाला धोका  निर्माण होऊ शकतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

प्रवचन झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घेण्याचा काळ

मोहन भागवत यांनी सरळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागावा. या तरुणांचा आवाज आहे त्या आवाजात सामील व्हा. प्रवचनं आम्ही तुमची ऐकतो, आम्ही तुमचा आदर करत आहोत. पण आता प्रवचन झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घेण्याचा काळ आहे. जसं वीर सावरकर म्हणाले होते, लेखण्या मो़डा आणि बंदुका हातात घ्या. त्यामुळे प्रवचन झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घ्या आणि सरकारला सांगा या सरकारच जनक हा संघ आहे. मोदी तुम्ही जा आणि आधी धर्मंद्र प्रधानांना घालवा असे मोहन भागवतांनी थेट सांगायला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

जंतरमंतरची लढाई मुलांकडून अत्यंत चाणाक्ष पद्धतीने लढली जातेय

जंतरमंतरची लढाई आहे ती मुलांकडून अत्यंत चाणाक्ष पद्धतीने लढली जातेय. ज्या पद्धतीने इराणने इस्त्रायल अमेरीकेला नमवले त्याच पद्धतीने या दोन हुकूमशाहींना जंतरमंतरील तरुणाई मोदी यांच्या सायबर सेलला, त्यांच्या आयटी सेलला उद्ध्व्स्त करुन टाकले. जंतर मंतर नव्हे तर देशभरातील तरुण वर्ग जेन्झी मोदी आणि त्यांच्या आयटी सेलला उद्ध्व्स्त करतोय आणि म्हणून मोदींनी मंत्र्यांना इन्साटाग्रामवर सक्रिय राहा अशा सूचना केल्या आहेत. कोणी राहायचं? मग मंत्र्यांनी कामं कधी करायची. धर्मेंद्र प्रधानानी काम कधी करायचीय किंवा ते जे माजी मंत्री आहेत बिहारचे त्यांची इन्साग्राम कोण चालवणार? इतर काही मंत्री आहेत अर्धशिक्षित अमित शहा सारखे तर मोदी अर्धशिक्षित आहेत त्यांचे इन्स्टाग्राम कोण चालवतय. हे सगळं एका भितीतून निर्माण झालेले आहे असे संजय राऊत म्हणाले.