Photo – छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ‘जेन झीं’चा जनसागर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतातील नव्या दमाच्या पिढीने, विद्यार्थ्यांनी आपल्या न्यायहक्कासाठी उभारलेला लढा त्यांच्या एकजुटीच्या बळावर जिंकला! खास त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा विजय जल्लोष’ कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनम वांगचूकजी, अभिजीत दिपके आणि तमाम युवकांचं अभिनंदन केलं. भारतातील युवकांची ताकद पुन्हा एकदा जगाने पाहिली. ही एकजूट अधिक बळकट करूया, अन्यायावर वार करूया! असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दिला.

या प्रसंगी हजारो तरुणांनी भारतमातेचा नारा दिला आणि हुकूमशाहीविरोधातला विजय साजरा केला. यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे तसेच हजारो देशप्रेमी उपस्थित होते.