
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सरकारने पेपरफुटी विरोधी विधेयक सादर केले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केले. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला घेरले असून संसदेत गदारोळ सुरूच आहे. त्यामुळे लोकसभेचे कामकाज तिसऱ्यांदा स्थगित करण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे. नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान पहिला आठवडा वादळी ठरल्यानंतर सोमवारी दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने लोकसभेत एक विधेयक सादर केले आहे. त्यात अधिक कठोर कायदेशीर तरतुदी आहेत. विरोधक पेपरफुटीप्रकरणी आक्रमक झाला आहे.
पेपरफुटीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष आक्रमक असताना धर्मेंद्र प्रधान संसदेत आले. पत्रकरांनी त्यांना प्रश्न विचारले. मात्र, मोन बाळगत उत्तरे देणे टाळले आणि उत्तर न देताच संसद परिसरातून निघून गेले. शनिवारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत दाखल झालेले माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, संसद भवनातून बाहेर आल्यावर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, पण ते गप्प राहिले.
या सर्व गोंधळात लोकसभा अध्यक्षांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले आणि सांगितले की, त्यांनी सरकार आणि सर्व पक्षांना एकमताने निर्णय घेण्यासाठी वेळ दिला असून, सायंकाळी ५ वाजता चर्चा पुन्हा सुरू होईल.
राज्यसभेतही गोंधळाचे वातवारण होते. काँग्रेस खासदारांनी विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी हा मुद्दा उपस्थित करून गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उत्तराची मागणी केली. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

























































