कॅनडात हिंदुस्थानी तरुणीची गोळ्या घालून हत्या, टोरंटो पोलिसांकडून आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडातील टोरंटो येथे हिंदुस्थानी वंशाच्या तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हा टार्गेट हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नवनीत कौर(26) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या हत्येप्रकरणी टोरंटो पोलिसांनी ब्रॅम्प्टनमधून एका आरोपीला अटक केली आहे. शरणजीत सिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी 7.23 वाजता टोरंटो पोलिसांना एक तरुणी जखमी अवस्थेत आढळली. या तरुणीला हंबरवुड बुलेवर्ड आणि रेक्सडेल बुलेव्हार्डजवळ गोळ्या घालण्यात आल्या होत्या. जखमी तरुणीला तातडीची वैद्यकीय मदत देण्यात आली. मात्र घटनास्थळीच तिला मृत घोषित करण्यात आले.

आरोपी शरणजीत सिंगवर फर्स्ट-डिग्री खून आणि हमीपत्राचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपीने तरुणीची हत्या का केली याबाबत अद्याप समजू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.