
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी रत्नागिरी शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, यासाठी श्री देव काशी विश्वेश्वर मंदिरात शिवसेनेच्यावतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी ठाकरे साहेबांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे साकडे घातले. त्यानंतर शिवाजी नगर येथील आय.टी.आय. लिंक रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
‘आशादीप’ संस्थेमधील मुलांना दैनंदिन जीवनात लागणारे आवश्यक धान्य आणि मिष्टान्न वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, किरण तोडणकर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे आणि विभागप्रमुख राजन शेटे, संदेश भिसे, राजाराम रहाटे, सिद्धेश्वर कोळी, तन्वीर मुजावर, पारस खानविलकर, अभय गुरव, सचिन सावंत देसाई, योगेश कोरगावकर, सर्फराज शेख तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंदार वारेकर, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सायली पवार, तालुका संघटक ममता जोशी, मिताली पवार, शहर संघटक सेजल बोराटे, नगरसेविका फौजिया मुजावर, ज्येष्ठ पत्रकार व लेखिका मेघना कोल्हटकर, प्रतिमा साळुंखे आणि स्मिताली नार्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

























































