
साखरेच्या भावात झालेल्या वाढीनंतर आता गुळाच्या भावात प्रति किलो 5 ते 6 रुपयांची वाढ झाली आहे. गुळाचे उत्पादन घटल्याने तसेच परदेशातून अचानक मागणी वाढल्याने गुळाचे दर वाढले आहेत. गुळाच्या दरात वाढ झाल्यानंतर आता ग्राहकांना आणखी महागाईचा सामना करावा लागत आहे. आधी 4900 रुपये क्विंटल मिळणारा गूळ आता 5100 रुपये क्विंटलवर पोहोचला.




























































