
ग्रीसची राजधानी अथेन्सजवळ जंगलातील आग विझवताना दोन अग्निशमन हेलिकाॅप्टर हवेत धडकले. धडकेनंतर एक हेलिकाॅप्टर जमिनीवर कोसळले. दोन्ही हेलिकाॅप्टरमध्ये प्रत्येकी दोन-दोन जण होते. त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वाऱयामुळे हेलिकाॅप्टरना समुद्रातून पाणी भरण्यातही अडचणी येत आहेत.


























































