देशात भाजपविरोधी लाट तयार होत आहे, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला. जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपच्या नीरज कुमार यांचा तब्बल 18 हजार मतांनी पराभव केल्या. गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात भाजपचा पराभव हा मोठा पराभव मानला जात आहे. यावरून काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

देशात भाजपविरोधी लाट तयार होत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निकाल आहे,. या मतदार संघात कधीही भाजप पराभूत झालेला नव्हता, तिथे प्रशांत किशोर विजयी झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

जंतरमंतरवरील कॉक्रोच आंदोलन आणि राम मंदिर चोरी प्रकरणाचा या निवडणुकीत किती परिणाम झाला याचे विश्लेषण करावे लागेल, पण परिणाम झाला आहे. नरेंद्र मोदींनी नेमलेले ट्रस्टी तिथे होते, त्याला मोदी अमित शाह योगी जबाबदार नाहीत का? असा सवाल देखील चव्हाण यांनी केला आहे.