आसाम पूरग्रस्तांसाठी रिलायन्स फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस 21 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम राज्यात आधीच सुरू असलेल्या मदतकार्याव्यतिरिक्त असेल.
‘आमच्या संवेदना, प्रार्थना आणि सहानुभूती आसाममधील जनतेसोबत आहे. या संकटात तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून येणाऱया काळातही तुमच्यासोबत राहू,’ असे रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता एम. अंबानी म्हणाल्या.



























































