समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेनला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील सहरसा येथे एका प्रवासी ट्रेनला आग लागली. सिमरी-बख्तियारपूर स्टेशनवर उभ्या असलेल्या समस्तीपूर-सहरसा मेमू ट्रेनच्या इंजिनला सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने गोंधळ उडाला. प्रवाशांनी ट्रेनच्या डब्यातून उड्या मारून पळ काढला. आगीने पुढील डब्यालाही आपल्या कवेत घेतले. इंजिनसह एक डबा जळून खाक झाला.