ब्राह्मण सेवा मंडळाने उभारले ‘आनंदाश्रम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळाच्या वतीने नवी मुंबईतील नेरुळ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आनंदाश्रम’ उभारले आहे. सध्या या आनंदाश्रमात 90 ज्येष्ठांच्या निवासाची सोय करण्यात आली असून 55 वृद्ध तेथे आश्रय घेत आहेत. आनंदश्रमात स्वावलंबी ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. या वृद्धांची काळजी घेण्यासाठी ‘आनंदशांती फाऊंडेशन’ या संस्थेशी सेवा करार करण्यात आला आहे.

भविष्यात कोणत्याही कारणास्तव या सेवेत खंड पडू नये व वृद्धांची सर्वतोपरी काळजी घेता यावी यासाठी गणेश पूजनाने या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली. आनंदाश्रम परिसरात उभारण्यात येणाऱया मंदिराचेही भूमिपूजन करण्यात आले. प्रस्तावित मंदिरात श्री गणेश, श्री दत्तगुरू व श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्तींची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तसेच या मंदिरात ‘गरुड-हनुमंतही’ विराजमान होणार आहेत. ‘सायडस बिल्डकॉन इंडिया’ कंपनीचे अजित पवार यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ब्राह्मण सेवा मंडळाचे अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य तसेच ‘आनंदशांती फाऊंडेशन’चे संचालक चंद्रकांत दळवी व कर्मचारी उपस्थित होते.