
टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील 15 आरोपींना भिवंडी न्यायालयाने येत्या 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी आज ठोठावली. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केल्यानंतर सर्वच आरोपींची पोलीस कोठडी भिवंडी पोलिसांनी मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने सर्वच आरोपींची रवानगी पुन्हा पोलीस कोठडीत केली. आज सर्वच आरोपींना न्यायालयात हजर केले असता सर्वांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
टीईटी पेपरफुटीप्रकरणी धीरज बलराज सिंग, राजीव शाव, आकाश कुमार सरोजकुमार, सुमनकुमारी विजेंदर गुप्ता, सोनूकुमार सिंह, मिथुनकुमार सिंह, कपिल कृष्णा दहिया, संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा, बाबुलाल कुशवाह, नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निकी, पवन यादव, हरिओम सिंग पोनी, बिजेंद्र गुप्ता, इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकू, सोनूकुमार दिवाकर अशा 15 जणांना अटक करण्यात आली आहे. शेवटच्या टप्प्यात बिजेंद्र गुप्ता, इंद्रजीत सिंग, सोनूकुमार दिवाकर हे मुख्य सूत्रधार अटक झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात पुन्हा 12 आरोपींची समोरासमोर तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. सर्व आरोपींची एकत्र चौकशी केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे, असे आरोपींचे वकील
अॅड. शैलेश गायकवाड यांनी सांगितले.



























































