
डेअरी मालकाला खंडणीसाठी धमकावणाऱ्या तोतया पोलिसाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. दीपक सिंग ठाकूर असे त्याचे नाव आहे. त्याचा दुसरा साथीदार हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
तक्रारदार याचा दुधाचा व्यवसाय आहे. रविवारी ते दुकानात असताना तिथे दोन जण आले. त्याने ते पोलीस असल्याचे भासवले. त्या दोघांनी तक्रारदार यांना कारवाईची धमकी दिली. कारवाई होऊ नये म्हणून त्याच्याकडे खंडणीची मागणी केली. विश्वास बसावा म्हणून त्याने एका पोलिसाचे ओळखपत्र दाखवले. ते दोघे तोतया पोलीस असल्याचे लक्षात आले. याची माहिती अंधेरी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर काहीच वेळात अंधेरी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले. तर गुलाब सिंग हा पळून गेला. त्या दोघांविरोधात अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला.



























































