एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणात लोकाभिमुख रचनेला प्राधान्य द्या – फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीने एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत एअर इंडिया इमारतीसंदर्भातील सादरीकरण महाराष्ट्र शासन करण्यात आले, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दशित केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यावेळी उपस्थित होते.

मुख्य सचिवांनी याबाबत संबंधितांची एक बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून सुयोग्य नियोजन करावे. विविध शासकीय विभागांतील कोणत्या विभागांचे स्थलांतर एअर इंडियाच्या नूतनीकरण इमारतीत करणे हे प्रशासकीय आणि नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल हे पाहावे. या ठिकाणी प्रशासकीय कार्यपद्धती ही सुलभ आणि लोकाभिमुख होईल यास प्राधान्य द्यावे. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.