
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या दोन वर्षांनी प्रथमच एका जाहीर कार्यक्रमात ऑनलाईन भाषण देणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाचे प्रसारण रोखण्याची बांगलादेश सरकारची विनंती हिंदुस्थानने फेटाळली आहे. शेख हसीना या 5 ऑगस्ट रोजी ‘फॉरेन करस्पाँडन्ट्स क्लब ऑफ साऊथ एशिया’तर्फे आयोजित कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत.

























































