
महागाईने आधीच मेटाकुटीला जीव आलेल्या सर्वसामान्यांना पुन्हा जोरदार झटका बसला आहे. राज्यात 11 ऑगस्टपासून गायी आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे गायीचे दूध आता 60 रुपयांवरून 62 रुपये तर म्हशीचे दूध 76 रुपयांवरून 78 रुपये प्रति लिटर झाले आहे.
दूध उत्पादक आणि दूध प्रक्रिया उद्योगाच्या कल्याणासाठी काम करणाऱया संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुधाच्या दरवाढीचा परिणाम दही, ताक, लोणी, पनीर, चीज, तूप, फ्लेवर्ड मिल्क व दुधापासून तयार होणाऱया मिठाईच्या किमतींवरही होईल.































































