
पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेल्या ‘एसआयआर’मधून हटविण्यात आलेल्या मतदारांशी संबंधित दाव्यांची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आज दिले. मतदारांच्या दाव्यांवर लवादांकडून होत असलेल्या विलंबाबाबत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी नाराजी व्यक्त केली. एवढय़ा धिम्या गतीने निर्णय घेण्यात आले तर पुढील निवडणूक येईल, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली.




























































