इऑन मॉर्गन बनू शकतो चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य प्रशिक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टीफन प्लेमिंगने चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले आणि आता ते इंग्लंडला प्रशिक्षण देत आहेत. पण चेन्नईच्या संघाच्या प्रशिक्षकपदी कोण, हे मात्र अद्याप ठरू शकलेले नाही. बऱ्याच जणांनी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमच्या नावाला पसंती दिली होती. पण आता मात्र इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इऑन मॉर्गनचे नाव समोर येत आहे. आयपीएलच्या मिनी लिलावानंतर मॉर्गन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असे संकेत आता मिळत आहेत.