
इंडिगोचे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने महिला प्रवाशाने विमानतळावर गोंधळ घातला. लगेज बेल्टवर चढून महिलेने एअरलाईन्स कर्मचाऱ्यांवर आरडाओरडा केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भुवनेश्वर विमानतळावर ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, भुवनेश्वर विमानतळावर इंडिगोचे विमान ऐनवेळी रद्द केल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. विमान कंपनीकडून पुरेशी मदत न मिळाल्याशिवाय प्रवासी विमानतळावरच राहिले, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. विमान रद्द झाल्याने महिला प्रवासी महिला संतप्त झाली आणि तिने विमानतळावरील लगेज बेल्टवर चढून गोंधळ घालू लागली. परिस्थिती चिघळल्याने सीआयएसएफच्या जवानांनी हस्तक्षेप केला. इंडिगोने अद्याप या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.




























































