उत्तराखंडमध्ये पर्यटकांची बस दरीत कोसळली; 22 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये पर्यटकांची बस दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात बसमधील 22 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील मुक्तेश्वर पर्यटन स्थळाकडे जात असताना हा अपघात झाला.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुक्तेश्वरजवळील सतबुंगा येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), पोलीस, राज्य आपत्ती निवारण दल (SDRF), जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बचावकार्य राबवत सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी फरिदाबाद येथील रहिवासी होते आणि मुक्तेश्वरला भेट देऊन भवालीकडे परतत होते.