अमित शहांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना विशेषाधिकार भंगाची नोटीस; २८ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल संसदेत केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर त्यांना २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत लेखी स्पष्टीकरण द्यायचे आहे.

काय आहे प्रकरण?

संसदेत ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्ग प्रतिबंधक) सुधारणा विधेयक २०२६’ यावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्याविरुद्ध असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप असून संसदीय नियम ३५३ नुसार पूर्वसूचना न देताच त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचा दावा भाजपच्या काही खासदारांनी केला आहे.

या प्रकरणी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी ३० जुलै रोजी तर डॉ. संजय जयस्वाल यांनी २९ जुलै रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. राहुल गांधींनी सभागृहाची आणि सदस्याची गरिमा दुखावली असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या खासदारांनी केली होती.