
किरकोळ वादातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बंगळुरुत घडली. यानंतर घाबरलेल्या पतीनेही गळफास घेत जीवन संपवले. घरमालकाने राजगोपाल नगर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पती-पत्नीमध्ये शुक्रवारी रात्री किरकोळ कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि पतीने पत्नीला मारहाण केली, यामुळे ती बेशुद्ध झाली. शनिवारी सकाळी पती पत्नीला उठवायला गेला असता तिचा मृत्यू झाल्याचे कळले. यामुळे घाबरलेल्या पतीने आधी आपल्या आईला घडला प्रकार सांगितल्याचे कळते. यानंतर आईला एक मेसेज पाठवून त्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.
आईने काही वेळाने मेसेज पाहिला आणि तात्काळ घरमालकाला कळवले. घरमालकाने जाऊन पाहिले असता तरुण गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. घरमालकाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.


























































