बँकांमध्ये 11,403 लिपिक पदांसाठी भरती, 21 ऑगस्ट अर्ज करण्याची अखेरची तारीख; 11 बँकांत नोकरीची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील एकूण 11 बँकांमधील भरती आयबीपीएसमार्फत केली जात असून लिपिक पदाची तब्बल 11 हजार 403 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अखेरची तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे. त्यामुळे अर्ज करण्यास अवघे पाच ते सहा दिवस उरले आहेत. भरती अंतर्गत पूर्व परीक्षा ऑक्टोबर 2026 तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2026 रोजी घेतली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट www.ibps.in यावर देण्यात आली आहे.

अर्ज करणाऱया उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच त्याला संगणकांची पदवी किंवा डिप्लोम केलेला असावा. उमेदवाराचे वय 20 ते 28 या दरम्यान असावे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवाराला 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला 850 तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवाराला 175 रुपये फी भरणे आवश्यक आहे.

राज्यनिहाय जागा

उत्तर प्रदेश – 1731, पश्चिम बंगाल – 946 , आंध्र प्रदेश – 186, अरुणाचल प्रदेश – 14, आसाम – 319, बिहार – 491 छत्तीसगड – 265, दिल्ली – 415, गोवा – 61, गुजरात – 698, हरियाणा – 196,  हिमाचल प्रदेश – 97, जम्मू-कश्मीर – 67, झारखंड – 182,  कर्नाटक – 1414,  केरलम – 108, मध्य प्रदेश – 1051, ओडिशा – 337, पंजाब – 481, राजस्थान – 392, तामीळनाडू – 675, तेलंगणा – 191.

महाराष्ट्रात 1 हजार 51 पदे भरणार

आयबीपीएसमार्फत एपूण 11 हजार 403 पदे भरली जाणार असून यात महाराष्ट्रात 1 हजार 51 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ही पदे भरली जाणार आहेत.

राज्यात प्रवर्गासाठी राखीव जागा

  • एससी        – 117
  • एसटी        – 96
  • ओबीसी     – 291
  • ईडब्ल्यूएस                   – 95
  • सामान्य    – 451
  • एकूण         – 1,051