सैन्यासाठी 1 हजार 577 कोटींचे करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी लष्करासाठी लॉइटरिंग म्युनिशन प्रणाली, दारुगोळा आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड आणि निबे प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांसोबत जवळपास 1,577 कोटी रुपयांचे करार केले. नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या.