वांद्र्यातील आगीत सात जण गुदमरले, भाभा रुग्णालयात उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पश्चिम रोडवरील सात मजली इमारतीला लागलेल्या आगीत सात जण प्रचंड धुरामुळे गुदमरल्याची घटना घडली. या सर्वांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत अवघ्या 26 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

वांद्रे पश्चिम येथील स्टेशन रोडवर एम के चेंबर ही सात मजली इमारत आहे. शनिवारी सकाळी 10.30 वाजता या इमारतीच्या एका रूममध्ये आगीची ठिणगी पडली. यामुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोळ पसरले. धुराचा त्रास होऊन गजाला शेख (47), जावेद शेख (48), ताहेरा शेख (28), मोहीमुद्दीन शेख (8), इस्माईल शेख (38), मारिया शेख (12) मेहनूर शेख (20) हे गुदमरले. अग्निशमन दलाने 10.49 वाजता नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दल व स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.