अनियंत्रित बसने यात्रेकरूंना चिरडले; चौघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीर दर्ग्यातून पायी परतणाऱ्या यात्रेकरूंना अनियंत्रित बसने चिरडल्याची घटना राजस्थानमध्ये शनिवारी रात्री उशिरा घडली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. झालावाड जिल्ह्यातील सरोला परिसरात ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, पावसामुळे झालेल्या निसरड्या उतारांमुळे एका खासगी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित बस रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या सहा यात्रेकरूंना चिरडले. जखमींपैकी एकाला तातडीने खानपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. उर्वरित पाच जखमींना झालावाड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाला गंभीर अवस्थेत कोटा येथे हलवण्यात आले असून, एकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.