रेड्डींच्या यूएस दौऱ्याला परवानगी नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याला केंद्राकडून मंजुरी मिळाली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय कारणास्तव मंजुरी देण्यास नकार दिला आहे. रेवंत रेड्डी सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांना अमेरिकेतील बोस्टनला जायचे होते. ते तेथून 30 ऑगस्टला हैदराबादला परत येणार होते. परंतु आता ते 23ला थेट हैदराबादला परत येतील.