
गोरेगावमधील आरे कॉलनीत गोठ्यातील पाण्याच्या टाकीत पोहताना दोन किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरे कॉलनीतील गौतम नगर भागात शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. झैब पटेल (15) आणि नकीब पटेल (13) अशी मयत मुलांची नावे आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ही दोन्ही मुले जोगेश्वरी गुंफा इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलमध्ये शिकत होती. शुक्रवारी ती शाळेत गैरहजर होती, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. दोघेही शाळेला दांडी मारून आरे कॉलनीतील पोहायला गेले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढत ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.



























































