‘माझा महाराष्ट्र.. भगवा महाराष्ट्र’ अभियान: एकजुटीने काम करा, विजय आपलाच; सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पेण, म्हसळ्यात सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

२०२९ मध्ये परिवर्तन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येणार आहे. विजय आपलाच होणार आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त करून दक्षिण रायगडमध्ये आगामी काळात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा, असे आवाहनही केले. शिवसेनेने सुरू केलेल्या ‘माझा महाराष्ट्र.. भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत पेण आणि म्हसळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये सुभाष देसाई बोलत होते.

निवडणुकांत सर्वसामान्य मतदारांना खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळाल्यानंतर जनतेचे प्रश्न विसरून जाणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा उघडा पडला आहे. सध्या स्वार्थाचे राजकारण सुरू आहे. सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत असल्याने त्यांना जनतेचे प्रश्न दिसत नाहीत. शिवसेनेमध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व असल्याने आजही सर्वसामान्य नागरिक त्यांच्या समस्या सोडवण्याकरिता शिवसेनेच्या शाखेमध्ये येतात, हाच जनतेचा विश्वास शिवसेनेची ताकद आहे, असे प्रतिपादनही शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यावेळी केले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय कदम, उपनेते बबन पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, दक्षिण रायगड संपर्कप्रमुख संजय कदम, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख – माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख दीपक निकम, जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे, स्विटी गिरासे, जिल्हा संघटक पद्माकर मोरे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, काशिनाथ भोईर, नितीन सावंत, बाळ राऊळ, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख आरिफ मणियार, जिल्हा सल्लागार नरेश अहिरे, चेतन पोटफोडे, यतीन धुमाळ, अभय कळमकर, शौकत हजवाने, शहरप्रमुख सुहास पाटील, उपजिल्हा संघटक अनिता पाटील, ममता पाटील, दर्शना गवके, रवींद्र पाटील, वैभव सावंत, ललित साने, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, तुकाराम चाळके, अरुण शिगवण, प्रभाकर ढेपे, आशिष कोळसकर, भगवान पाटील, संतोष पाटील, चेतन मोकल, विभागप्रमुख राजू पाटील, चंद्रकांत गायकवाड, वसंत म्हात्रे, नंदू मोकल, योगेश पाटील, नरेश सोनावणे, जयराज तांडेल आदी उपस्थित होते.

* सध्या राज्यात एसआयआर मोहीम सुरू असून त्यामध्ये सर्व वैध मतदारांची नोंद होणे आवश्यक आहे. एकही मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये याची काळजी शिवसैनिकांनी घ्यायला पाहिजे, असेही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
* कोरोना महामारीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख व्यवस्था केली होती. महामारीच्या संकटाचा मुकाबला करून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली. उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दखल युनायटेड नेशननेही घेतली होती, असेही सुभाष देसाई यावेळी म्हणाले.