
ऑगस्ट महिन्यातील 24 दिवसांत सोने तब्बल 20 हजार रुपयांनी महागले आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मागील पाच दिवसांत सोने 8 हजारांनी महागले असून सोन्यातील ही दरवाढ अशीच चालू राहिल्यास सोने 1 लाख 70 हजारांच्या जवळ जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र जास्त पैसे मोजावे लागत आहेत. 3 ऑगस्टला 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 42 हजार 291 रुपये होता. परंतु 24 ऑगस्टला सोन्याचा दर 1 लाख 63 हजार 970 रुपयांवर पोहोचला आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दराचा उच्चांक 29 जानेवारीला 1 लाख 93 हजार रुपये होता. 24 कॅरेट प्रमाणे 22 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.


























































