‘भुलेश्वरचा राजा’च्या मदतीला धावला ‘लालबागचा राजा’; मंडळाला 11 लाखांची तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर अचानक ओढवलेल्या  दुर्दैवी संकटाच्या काळात ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ मदतीला धावले असून आर्थिक मदत जाहीर केली आहे.

भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाने पुन्हा एकदा उभारी घ्यावी यासाठी लालबागचा राजा मंडळाने 11 लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. तसेच या दुर्घटनेत जीव गमावलेल्या भुलेश्वरचा राजा मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी आणि खजिनदार मंगेश दळवी यांनी संपूर्ण कार्यकारिणीच्या एकमताने मदत जाहीर केली आहे. तसेच गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने (मुंबईचा राजा) तीन लाख रुपयांची मदत केली आहे.