बाप्पा पावला! पोस्टात ‘मेगाभरती’, 23 हजार 757 पदे भरणार, उद्यापासून अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील विविध पोस्ट खात्यांमध्ये तब्बल 23 हजार 757 पदांची भरती करण्यात येणार आहे. ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक अशा तीन विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकष पूर्ण करणाऱया उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

भरतीसंबंधी सविस्तर माहिती www.indiapost.gov.in या पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. अर्ज भरण्यास उद्या 31 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात होणार असून 21 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सरकारी नोकरीची संधी मिळविण्यासाठी हजारो तरुण या भरतीकडे आशेने पाहत असून, पोस्ट खात्यातील या मेगाभरतीमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. ऐन गणेशोत्सवात ही मेगाभरती निघाल्याने बेरोजगार तरुणांना बाप्पा पावला आहे.

शैक्षणिक पात्रता – दहावी पास, संगणकाचे ज्ञान, सायकल चालवता यायला हवी.

वयाची अट – 21 सप्टेंबर रोजी 18 ते 40 वर्षे

फी – सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस 100 रु., एससी, एसटी, महिलांना फी नाही.

पगार

  • ब्रांच पोस्ट मास्टर ः 12 हजार ते 29,380 रुपये
  • असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ः 10 हजार ते 24,470
  • डाक सेवक ः 10 हजार ते 24,470

राज्यनिहाय जागा

महाराष्ट्र – 2431

पश्चिम बंगाल        – 1762

उत्तर प्रदेश              – 1691

उत्तराखंड – 452

तेलंगणा – 419

तामीळनाडू            – 2118

पंजाब      – 123

राजस्थान              – 1009

ओडिशा   – 1353

मध्य प्रदेश             – 1450

बिहार      – 1098

छत्तीसगड         – 762

गुजरात            – 499

कर्नाटक           – 1116

झारखंड            – 1379

हरयाणा           – 325

आसाम            – 414

आंध्र प्रदेश        – 917

दक्षिण-पश्चिम विभाग     – 2614

जम्मू-कश्मीर    – 340

हिमाचल प्रदेश – 335

दिल्ली             – 16

एकूण             – 23,757

महाराष्ट्रातील जागा

सामान्य   – 1016

ओबीसी    – 600

एससी      – 241

एसटी              – 194

ईव्हीएसडब्ल्यू – 248

अन्य               – 132