मोदी पुन्हा विदेश दौऱ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दर महिन्याला विदेश दौऱयावर जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मोदी यांचा हा विदेश दौरा चार दिवसांचा असून या वेळी ते उझबेकिस्तानला आणि किर्गिस्तानला जाणार आहेत. मोदी 29 ते 30 ऑगस्ट रोजी उझबेकिस्तानची राजधानी ताश्पंदमध्ये असतील. पंतप्रधान म्हणून हा त्यांचा चौथा उझबेकिस्तान दौरा आहे. उझबेकिस्तान दौऱयानंतर मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे असतील. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे होणाऱया शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेतही सहभागी होतील. या दरम्यान ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेऊ शकतात.