
पुण्याची कन्या आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज पूजा घाटकर हिची जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या 10 मीटर रायफल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. मार्च 2025 पासून ती हिंदुस्थानी संघाची प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तिच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ देशातील नवोदित नेमबाजांना होत आहे.

























































