भाईंदरमध्ये शिवसेनेची घोडदौड, राजन विचारे यांच्या उपस्थितीत युवासेना जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना-युवासेनेची जोरदार घोडदौड सुरू असून मीरा रोड पूर्वेतील पेणकर पाडा येथे युवासेना जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते, खासदार राजन विचारे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा युवाधिकारी दीपेश गावंड यांच्या पुढाकारातून पेणकर पाडा येथे युवासेनेच्या जिल्हा कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शिवसेना नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भगव्या जल्लोषात पार पडला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक नीलम ढवण, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, जिल्हा सचिव सुभाष केसरकर, उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर, श्रेया साळवी, क्षमा गांधी, शहरप्रमुख प्रशांत सावंत, संभाजी पालांडे, नोमान अंसारी, मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.

युवकांच्या प्रश्नांना वाचा फुटेल

मीरा-भाईंदरमध्ये उभ्या राहिलल्या युवासेनेच्या जिल्हा कार्यालयामुळे युवकांच्या प्रश्नांना वाचा फुटून त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. हे कार्यालय समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असा विश्वास