फेडरर टेनिसच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेनिसविश्वातील महान खेळाडू रॉजर फेडररचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. अमेरिकेतील रोड आयलंडच्या न्यूपोर्ट येथे झालेल्या सोहळ्यात फेडरर भाषण करताना अनेकदा भावुक झाला. कुटुंबीय, मित्र, बॉल किड्स आणि कारकिर्दीत साथ देणाऱयाचे आभार मानताना त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठय़ा सन्मानांपैकी एक आहे. मात्र, यश मिळवणे हे कधीच माझे अंतिम ध्येय नव्हते. मला आवडते ते काम करत आयुष्य जगणे आणि तेवढेच टेनिसवर प्रेम करणाऱया लोकांसोबत राहणे, हेच माझे ध्येय होते,’ असे फेडररने सांगितले. स्वित्झर्लंडच्या या दिग्गजाने 2022 मध्ये व्यावसायिक टेनिसला अलविदा केला. कारकिर्दीत त्याने 20 ग्रँडस्लॅम आणि 103 एटीपी विजेतेपदांवर नाव कोरले.