
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱयातील गोंधळाचा फटका बसलेल्या सुमारे 33 हजार चाहत्यांचे तिकीटाचे पैसे परत करण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. रिफंडची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी राज्याच्या क्रीडा बजेटमधून निधी दिला जाणार आहे. गेल्या डिसेंबरमध्ये सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या ‘जीओएटी इंडिया टूर’दरम्यान व्हीआयपी, नेते आणि अधिकाऱयांची मैदानाजवळ गर्दी झाल्याने अनेक चाहत्यांना मेस्सीचे दर्शनही नीट घेता आले नाही. चार ते आठ हजार रुपये मोजून तिकीट घेणाऱया चाहत्यांमध्ये त्यामुळे संताप उसळला होता. एका डिलिव्हरी कर्मचाऱयाने मेस्सीला पाहण्यासाठी वर्षभराची बचत खर्च केल्याचे उदाहरणही मुख्यमंत्र्यांनी दिले.




























































