
पंचविसाव्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या नोव्हाक जोकोविचचा युएस ओपन 2026 मधील प्रवास पहिल्याच फेरीत संपुष्टात आला आहे. आर्थर ॲश स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक सामन्यात अर्जेंटिनाच्या मरियानो नाव्होनेने जोकोविचचा 7-6 (5), 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशा 5 सेट्समध्ये पराभव केला. तब्बल साडेचार तास हा सामना रंगला.
न्यूयॉर्कमधील प्रचंड गरमीचा फटका 39 वर्षीय नोवाक जोकोविच याला बसला. पहिल्या तीन सेट्समध्ये जोकोविच 2-1 असा आघाडीवर होता. त्यानंतर मध्यांतराला जोकोविचची प्रकृती खालावली आणि जाहिरात बोर्डमागे जाऊन त्याने उलटी केली. एवढेच नाही तर चेंजओव्हर दरम्यान तो मानेवर, डोक्यावर बर्फाच्या पट्ट्याही ठेवत होता.
Novak Djokovic with a heartfelt moment to the crowd after his 1st round loss at the U.S. Open
He struggled with his body tonight, but kept fighting for 4 hours & 36 minutes at 39 years old
Leaving with grace and & nothing but love
What a legend. pic.twitter.com/wDO16xpKsa
— The Tennis Letter (@TheTennisLetter) August 31, 2026
प्रकृती खालावली तरीही जोकोविचने नेटाने झुंज दिली. चौथ्या सेट गमावल्यानंतर सामना 2-2 असा बरोबरीत आला होता. पाचव्या आणि निर्णायक सेटपूर्वी जोकोविचला तीव्र वेदना झाल्या, त्यामुळे त्याला तातडीने मेडिकल टाईमआऊट घ्यावा लागला. फिजिओकडून उपचार घेतल्यानंतर वेदनांनी विव्हळत पंचांना थम्ब्स-अप करत त्याने पुन्हा कोर्टावर पाऊल ठेवले. त्याने आपला सर्व अनुभव आणि जिद्द पणाला लावली, पण मरियानो नाव्होनेच्या दमदार खेळापुढे त्याचा निभाव लागला आणि सेटसह जोकोविचने सामनाही गमावला.
दरम्यान, सामना गमावून जेव्हा 24 ग्रँडस्लॅमचा बादशहा कोर्टबाहेर पडू लागला, तेव्हा आर्थर ॲश स्टेडियममधील प्रत्येक प्रेक्षकाने उभे राहून त्याच्या या जिद्दी खेळाला आणि संघर्षाला सलाम केला. जोकोविच यापुढे किती काळ टेनिस खेळणार याबाबत साशंकता असली, तरी त्याने 2028 च्या लॉस एंजिलीस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा याआधी व्यक्त केली आहे.


























































