सौदी अरेबियाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी, गुजरातमध्ये आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरेबियाहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानाचे गुजरातमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात 32 प्रवासी होते. सर्वांना सुखरूप विमानातून उतरवण्यात आले. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून विमानाची कसून तपासणी सुरू आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे विमान सौदी अरेबियातील दम्मामहून दिल्लीला चालले होते. प्रवासादरम्यान विमानातील प्रसाधनगृहात बॉम्ब हा शब्द लिहिलेला टिश्यू पेपर सापडल्याने खळबळ उडाली. यानंतर विमानाचे गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर टर्मिनल 2 वर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.