असं झालं तर… शेतजमिनीचे बक्षीसपत्र रद्द करायचे आहे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडीलधारी व्यक्ती आपल्या मुलांना किंवा विश्वासूंना शेतजमीन बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरित करते. एकदा स्वीकारलेले आणि नोंदणीकृत झालेले बक्षीसपत्र सहजपणे रद्द करता येत नाही.

कायद्याने बक्षीसपत्र काही विशिष्ट परिस्थितीत रद्द करण्याची मुभा आहे. व्यक्ती दस्तऐवज करताना मानसिकदृष्टय़ा असमर्थ असल्याचे सिद्ध झाल्यास ते रद्द करता येऊ शकते.

बक्षीसपत्र फसवणूक, धमकी किंवा चुकीची माहिती देऊन केले असल्यास ते रद्द करता येऊ शकते. रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो.

बक्षीसपत्र सर्व पुरावे, साक्षीदार आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. दोन्ही पक्षांची परस्पर संमती असल्यासच ते रद्द होऊ शकते.

ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट, 1882 मधील कलम 122 नुसार बक्षीसपत्र वैध ठरते. शेतजमीन असल्यास हे बक्षीसपत्र नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.