Chhatrapati Sambhaji Nagar News – ‘हर हर महादेव कावड यात्रे’ने शहर दणाणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरात भव्य कावड यात्रा काढण्यात आली. क्रांतीचौक येथून सुरू झालेली ही कावड यात्रा खडकेश्वर मंदिर येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’, ‘जय भवानी, जय शिवाजी ‘च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून पवित्र नद्यांचे जल आणून कावडीत सहभागी झालेल्या हिंदू बांधव-भगिनींनी खडकेश्वर येथे भगवान महादेवाचा जलाभिषेक केला.

या कावड यात्रेत महिला पारंपरिक भारतीय वेशभूषेत भगवे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पुरुर्षांनी पारंपरिक पांढरी वस्त्रे परिधान केली होती. हलगी पथक, संबळ, झांज पथक तसेच उज्जैन येथील ‘श्री भस्म रमैय्या भक्त मंडळा’चे झांज पथक आणि ‘दिल महाकाल’ पथकाच्या सहभागामुळे यात्रेला विशेष धार्मिक व सांस्कृतिक रंग प्राप्त झाला. वारकरी परंपरेतील भजने, गवळणी, अभंग, मृदंग आणि विविध पारंपरिक वाद्यांच्या साथीने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

अंबादास दानवे यांनी स्वतः कावड हातात घेऊन क्रांती चौक ते खडकेश्वर हा संपूर्ण प्रवास अनवाणी पायांनी केला. त्यांच्या या सहभागामुळे शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मार्गावर ठिकठिकाणी व्यापारी, छोटे व्यावसायिक, उद्योजक तसेच माता-भगिनी आणि नागरिकांनी कावड यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. पुरुषांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले, तर माता-भगिनींसह तरुण-तरुणींनी उत्साहात नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.

मुस्लिम बांधवांकडून पाणी वाटप

कावड यात्रेदरम्यान सामाजिक सलोख्याचेही दर्शन घडले. पैठण गेट परिसरात मुस्लिम बांधवांनी कावड यात्रेतील सहभागौंसाठी पाण्याची व्यवस्था करून यात्रेचे स्वागत केले. या स्वागतामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश देण्यात आला.

मनपाच्या स्वच्छता पथकाकडून संदेश

कावड यात्रेच्या माध्यमातून धार्मिकतेसोबतच स्ववच्छतेचा संदेशही देण्यात आला. महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘स्वच्छता राखा, कचरा फेकू नका’ असा संदेश देण्यात आला, यात्रेतील सहभागी आणि स्वयंसेवकांनीही परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे धार्मिक उत्साहासोबत सामाजिक जबाबदारीचे भानही या यात्रेतून अधोरेखित झाले.

या कावड यात्रेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, राज्य संघटक चेतन कांबळे, सहसंपर्कप्रमुख अनिल चोरडिया, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, संतोष खंडके, राजू इंगळे, अविनाश पाटील, अशोक शिंदे, विठ्ठल बदर, अरविंद धिवर, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, सोमीनाथ करपे, रघुनाथ घरमोडे, दिलीप मचे, आनंद भालेकर, राजू बरकड, संजय मोटे, विष्णु जाटव, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, किसानसेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, बाबासाहेब मोहिते, मुस्ली चौधरी, जिल्हा परिषद गटनेते मनोज पेरे, मनपा गटनेते गणेश लोखंडे, मनोज गायके, प्रमोद ठेंगडे, गिरीश चपळगांवकर, वीरभद्र गादगे, वसंत प्रधान, विशाल खंडागळे, रामेश्वार कोरडे, सचिन खैरे, राहुल सोनवणे, राहुल वाणी, महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक अनिता मंत्री, सुनीता देव, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनीता सोनवणे, राजश्री पगार, भागूआक्का शिरसाठ, पद्मा शिंदे, सुनंदा खरात, अरुणा भाटी, नलिनी बाहेती, मीरा देशपंडे, कविता सुरळे, वंदना कुलकर्णी, रुपाली मुंदडा, मनीषा खरे, रंजना कोलते, सीमा गवळी, लता शंकपाळ, रंजना आहेर, सारिका शर्मा, विद्या गायकवाड, सुनीता सोनवणे, प्रतिभा राजपूत, मीना पाटील, मनीषा ठाकरे, शोभा साबळे, मंगल डोंगरे, अर्चना काचार, राजश्री पोफळे, बबिता रणयेवले, पंचकला काळे, मनीषा कडवकर, युवासेनेचे धर्मराज दान्वे, अजय चोपडे, दुराज काळे, श्रीकृष्ण पांचाळ, कोमल पांढरे, दीपाली पाटील, ऋतुजा जोगदंड, वैष्णवी काळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महिला व युवासैनिक सहभागी झाले होते.

उज्जैनच्या डमरू पथकाने लक्ष वेधले

उज्जैनहून आलेल्या भाविकांच्या हातातील डमरू आणि विविध वाद्यांच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीने यात्रेची शोभा वाढवली, शहरातील विविध भागांतील महिला भजनी मंडळांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

बाल वारकरी पावली खेळण्यात दंग

श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था, निल्लोडच्या विद्याथ्यर्थ्यांनी वृंदावनातील रास, पावल्या, फुगड्या तसेच विविध सजीव देखावे सादर केले. भगवान शंकर, वेताळ-भुते यांचा वेशांतरातील देखावा आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

महिला भजनी मंडळांचे अभंग, गवळण, भारुड

यात्रेत गजानन महाराज महिला भजनी मंडळ, आदर्श महिला भजनी मंडळ, सरस्वती महिला भजनी मंडळ, रुक्मिणी महिला भजनी मंडळ, शिवशक्ती महिला भजनी मंडळ, जानकी महिला भजनी मंडळ, अष्टविनायक महिला भजनी मंडळ, बाळकृष्ण महिला भजनी मंडळ, रामकृष्ण महिला भजनी मंडळ, पार्वती महिला भजनी मंडळ तसेच सरस्वती महिला भजनी मंडळ-खोकडपुरा यांचा सहभाग होता. बालाजी काळे व शंकर जाधव यांनी चोपदार म्हणून, तर राहुल महाराज व हर्ष महाराज यांनी मृदंगाचार्य म्हणून सेवा बजावली.

खडकेश्वर महादेवाला जलाभिषेक

खडकेश्वर मंदिर परिसरात कावड यात्रा पोहोचल्यानंतर भगवान महादेवाला पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवान शंकराची आरती करण्यात आली आणि कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. संपूर्ण यात्रेत शिवभक्त, वारकरी, महिला, तरुण-तरुणी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने शहरात दिवसभर मक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.