
शिवसेना माहीम विधानसभा आणि ‘धगधगती मुंबई’ परिवाराच्या सहकार्याने यंदाच्या दहीकाला उत्सवानिमित्त शुक्रवारी दुपारी ३ वाजता कमला मेहता अंध मुलींची शाळा, दादर (पूर्व) येथे ‘एक हंडी दिव्यांगांसाठी’ या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थिनींना दहीकाला उत्सवाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला आहे. यामध्ये दिव्यांग विद्यार्थिनींचा गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय शनिवारी केशव दाते उद्यान, दादर (पश्चिम) येथे मुख्य दहीकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी २ लाख ५१ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले आणि ‘धगधगती मुंबई’चे भीमराव धुळप हे आहेत.

























































