इंजिनात बिघाड, इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्याहून दिल्लीला निघालेल्या इंडिगोच्या विमानात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाचे गोवा विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण 229 प्रवासी होते. विमानाचे इंजिन बिघडल्याची माहिती समजताच या प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला, परंतु सुदैवाने हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

इंडिगोचे 6ई 2102 हे विमान मंगळवारी उत्तर गोव्यातील मोपा विमानतळाहून सकाळी 9 वाजून 20 मिनिटांच्या आसपास विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आल्यानंतर विमान पुन्हा विमानतळाकडे वळवण्यात आले.