लष्कराच्या छावणीतून चार एके-47, 11 शस्त्रे चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादच्या सिकंदराबादमधील लष्करी छावणी परिसरात कडेकोट सुरक्षा असताना चार एके-47 रायफलींसह एकूण 11 शस्त्रे चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेल्या शस्त्रांमध्ये चार एके-47 रायफल्स, सहा पिस्तुले आणि एक आयएनएसएएस रायफल यांचा समावेश आहे. ही शस्त्रे मद्रास रेजिमेंटच्या परिसरातील एका खोलीत ठेवण्यात आली होती. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. अज्ञात व्यक्तीने सुरक्षा क्षेत्रात प्रवेश करून खोलीचे कुलूप आणि दरवाजा तोडल्याचा पोलिसांना संशय आहे. शस्त्रे चोरीला गेल्याने लष्कराला या प्रकरणात आतील व्यक्तीचा सहभाग असण्याचा संशय आहे.