पालिका शाळांमध्ये निकृष्ट मध्यान्ह; भोजनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, एफडीए आयुक्तांकडे शिवसेनेची कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका असल्याने याची गंभीर दखल घेऊन एफडीएने दोषींवर तत्काळ व कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पालिका शाळांतील मध्यान्ह भोजन निकृष्ट दर्जाचे असून शिजवताना आणि पुरवताना स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. या गंभीर समस्येबाबत संबंधित पुरवठादार संस्थांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अन्नात अळ्या आणि कचरा आढळणे, अन्न अर्धवट शिजलेले असणे यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबद्दल शिवसेना नगरसेवक, शिक्षण समिती सदस्य अंकित प्रभू यांनी एफडीएच्या आयुक्तांना पत्र लिहीत कारवाईची मागणी केली आहे.