
जयपूरच्या नाहरगड बायोलॉजिकल पार्कमध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सुगना देवी असे या महिलेचे नाव असून ती मजूर होती. टायगरच्या एन्क्लोजरमध्ये गवत कापण्यासाठी ती आत शिरली होती. याच वेळी कोणीतरी वाघाच्या पिंजऱ्याचे गेट उघडले, असा दावा सुगना देवीसोबत गेलेल्या महिलांनी केला आहे.


























































